Saturday, 13 December 2014

देव देवळात नाही माणसात आहे - संत गाडगेबाबा


देव देवळात नाही माणसात आहे

- संत गाडगेबाबा

   


                                   यांच्या स्मृतीदिनी त्यांना कोटी कोटी विनम्र अभिवादन - प्रणाम...




संत गाडगेबाबाची कीर्तन शैली -

गाडगेबाबा ३० वर्ष पंढरीच्या वारीला आषाढी आणि कार्तिकीच्या वारीला गेले पण... एकदाही पंढरीच्या देवळात जाऊन विठलाचे दर्शन घेतले नाही.... एकदाही आषाढी - कार्तिकीचा उपवास पकडला नाही ...गाडगेबाबा पंढरीला जाऊन लोकांनी खराब केलेल्या चंद्रभागा नदीचा किनारा स्वतःच्या खराट्याने झाडून साफ करत असत....आणि मग रात्री हजारो लोकांसमोर कीर्तन करायला उभे राहत त्यावेळेचे गाडगेबाबांचे हे कीर्तन ....

---------------------------------------------------
गाडगेबाबा - लोकांना उदेशून..... देव पहिला का देव ???


लोक - पहिला जी !!!!


गाडगेबाबा - कमाल आहे ... तुम्ही देव पहिला ...तुमचा देव कोठे राहतो....?????


लोक - आमचा देव देवळात राहतो तो रंगाने सावळां आहे , आमचा विठल विटेवर
उभा आहे , त्याच्या बाजूला रुखमाई आहे .


गाडगेबाबा - कमाल आहे तुमचा देव देवळात राहतो ... माझा देव मनात राहतो !!!


गाडगेबाबा - तुमचा देव आंघोळ करतो की नाही ????


लोक - करतो तर !!!


गाडगेबाबा - तुमच्या देवाले आंघोळ कोण घालते ????


लोक - आम्हीच घालतो जी !!!!


गाडगेबाबा - अरे तुमच्या देवाले स्वतः ची आंघोळ स्वतःकरता येत नाही तो

तुम्हाले तुमच्या भाग्याची आंघोळ रे काय घालणार !!!!


गाडगेबाबा - तुमचा देव धोतर नेसतो की नाही ????


लोक- नेसते तर !!!


गाडगेबाबा - तुमच्या देवाले धोतर कोण नेसवते ???


लोक - आम्हीच जी !!!


गाडगेबाबा - अरे...रे तुमच्या देवाले स्वतःचे धोतर स्वतः नेसता येत नाही

तो तुम्हाले तुमच्या भाग्याचं वस्त्र रे काय देणार !!!!


गाडगेबाबा - तुम्ही देवाले नैवैद्य दाखवता की नाही ???


लोक - दाखवतो जी !!!


गाडगेबाबा - नैवैद्य दाखवून काय करता ???


लोक- नैवैद्याच्या बाजुले काठी घेऊन बसतो !!!!


गाडगेबाबा - कशाला ???


लोक - देवाला वाढलेले नैवैद्य खायला कावळा... कुत्रा आला तर त्याला
काठीने हाकलायला !!!


गाडगेबाबा - अरे ...रे ...जर तुमच्या देवाले स्वतःसाठी वाढलेल्या
नैवैद्द्याचे स्वतः रक्षण करता

येत नाही तो तुमच्या आयुष्याचे रक्षण रे काय करणार ???


गाडगेबाबा - जीता-जागता देव कुणी पहिला आहे का ?????????


लोक - मग लोक कावरया... बावऱ्या नजरेने एकमेकांकडे बघायचे आणि

गाडगेबाबांना नाही उत्तर द्यायचे ...

"गाडगेबाबांच्या बाजूला नेहमी एक माणुस उभा असायचा , रापलेला चेहरा ....
जाढे-भरढे खादीचे कपडे ... पांढरी शुभ्र दाढी ...पाय अनवाणी गाडगेबाबा
त्या माणसाकडे बोट दाखवत लोकांना सांगायचे अरे....

हे भाऊराव पाटील बघा हे गरीबाच्या....महारा-मांगाच्या पोरांना शिकवायचे
काम करते त्याला देव

म्हणा .....अरे ते बाबासाहेब आंबेडकर बघा देशासाठी मर-मर मारते त्याला
देव म्हणा ....!!!!

अरे अडाण्याला शिक्षण द्यावं ...

बेघरांना घर द्यावं....

रंजल्या - गांजल्याची सेवा करावी ..

मुक्या प्राण्यावर दया करावी ...

बापहो देव यांच्यात राहतो

बापहो देव देवळात राहत नाही

देव आपल्या मनात राहतो

देवळात फक्त पुजाऱ्याचे पोट राहते !!

---------------------------------------------------


आसमंतातील, परिसरातील घाणकचरा एकदा- दोनदा झाडून टाकला, तरी तो परत परत जमा होतोच. लोकांच्या मनातील कुविचारांचा कचरा आणि तण बाजूला केले, तरी परत तेथे उगवतेच. समाजमनामध्ये चांगले विचार रुजविण्याचे प्रयत्न सातत्याने चालू राहिले पाहिजेत. - असे प्रयत्न मनोभावे करणारे गाडगेबाबा वारंवार जन्म घेत नसतात हेच सत्‍य.


अश्या या महान संतांचा मृत्यू २० डिसेंबर १९५६ रोजी पेढी नदीच्या काठावर वलगाव (गाडगेनगर) अमरावती येथे स्मारक आहे. 


नतमस्तक या खऱ्या संतापुढे !! 

गोष्ट छोटी.... डोंगराएव्हडी...

गोष्ट छोटी.... डोंगराएव्हडी...
.
एकदा गाडगेबाबा नाशिकच्या गोदावरी नदीच्या पात्रा जवळून चालले होते...तेव्हा नदीच्या पात्रा जवळ पत्रावळी वर भात ठेवला होता...बाबा त्या पत्रावळी वरचे खायला गेले असता...२-४ मानस धावत आले...गाडगे बाबा वर खेकसले..
"अरे मूर्ख माणसा, आम्ही पितर जेवू घालतोय... कावळा येईल आणि खाईल त्याची वाट बघतो आम्ही..."

बाबा म्हणाले, " मंग काय होईन बावजी?"

एक जण म्हणाला, "अरे तो कावळा आमच्या पितरांना स्वर्गात तो घास घेवून जाईन.."
असे म्हटल्यावर बाबा तिथून निघून गेले...
नदीच्या पात्राचे पाणी पात्रा बाहेर फेकायला लागले... तीच २-४ माणसे धावत आले, म्हणाले. "अरे मूर्ख माणसा आता हे काय करतोस?"

बाबा म्हणाले, "माय वावर उमरावती जिल्ह्यात दर्यापूर तालुक्यात शेंडगावले हाय... त्या वावरले पानी ओलोवतो..."

ती माणसे म्हणाली "अरे मूर्ख माणसा, इतक्या दूर ते पाणी जाईल कसे?"
बाबा म्हणाले, "बावाजी, तो कावळा जर तुमचा घास जर स्वर्गात नेते.. त माय पानी कावून जानार नाई माया वावरत नाही?"

एक हि वर्ग न शिकलेल्या माणसाला ही अक्कल होती...
अन आज ही शिकलेले माणस आपल्या आई-बापाला जिवंतपणी तर नाही पण ते मेल्यावर पितरं खाऊ घालतात?....
धन्य त्यांच्या पदव्या आणि धन्य ते लोक...