Friday 23 November 2012

26 नोव्हेंबर.....संविधान दिन....!









26 नोव्हेंबर.....संविधान दिन....!


                                                                           

भारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. भारतीय संविधानावर विविध पाश्चात्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ ,१९५०पासून राज्यघटना अमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतीलप्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे


१९५० साली अमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे १९३५च्या भारत सरकार कायद्यावर (Government of India Act of 1935) वर आधारित आहे. १९३५सालच्या या कायद्यान्वये भारताच्या अंतर्गत स्वशासनाचा पाया घातला गेला होता. ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट ऍटली यांच्या शिष्टमंडळाच्या स्वतंत्र भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यासाठी एका मसुदा समितीच्या स्थापनेविषयीच्या कल्पनेस भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या नेत्यांनी सहमती दर्शविली होती. १९४६च्या उन्हा़ळ्यात या समितीची स्थापना झाली व तिची पहिली बैठक डिसेंबर ९ ,१९४६ रोजी सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे पार पडली. ऑगस्ट १५१९४७ रोजी भारतास स्वातंत्र्य मिळाल्यावर अल्पकाळ या समितीने भारताचे प्रतिनिधी रूपात काम केले होते.


         ऑगस्ट २९, १९४७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान समिती स्थापन झाली. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी स्वीकारला गेला. यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस "भारतीय संविधान दिन" म्हणून साजरा केला जातो.नागरिकत्व, निवडणूका व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तत्काळ लागू झाल्या. संविधान संपूर्ण रूपाने जानेवारी २६ १९५० रोजी लागू झाले. त्यामुळे २६ जानेवारी हा दिवस "भारतीय प्रजासत्ताक दिन" म्हणून साजरा केला जातो.

भारताची राज्यघटना उद्देशिका (Preamble), मुख्य भाग व १२ पुरवण्या (परिशिष्टे) अशा स्वरूपात विभागली आहे. मुख्य संविधानाचे २२ विभाग असून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे. सुरूवातीच्या ३९५ कलमांपैकीची काही कलमे आता कालबाह्य झाली आहेत

सध्या राज्यघटनेत ४०० कलमे असून; भारतीय संविधान जगातल्या सर्वांत मोठ्या संविधानांमध्ये मोडते.

भारतीय इतिहासातील संविधानच्या अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली असली तरी जगातील सर्वश्रेष्ठ संविधान समजले जाणारे "भारतीय संविधान" 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने स्वीकारले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत घेऊन या संविधानाची निर्मिती केली, या रोजी जगातील सर्वात मोठी लोकशाही असणार्‍या भारताने भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीने खर्‍या अर्थाने लोकशाहीची प्रस्थापना झाली. म्हणून 26 नोव्हेंबरला हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो.

भारतीय संविधानासंदर्भात जन-जागृती, माहिती व्हावी यासाठी संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन
 करण्यात येत असे, मात्र ते सार्वत्रिक पातळीवर होत नाहीत. याबाबत महाराष्‍ट्र शासनाने यापुर्वी जनतेला 26 नोव्हेंबरला 'भारतीय संविधान द‍िन' साजरा करण्याचे ही आवाहन केले होते. मात्र यासंदर्भात राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची महाविद्यालये आदी आजही अनभिज्ञ दिसत आहे. शासनाने भारतीय संविधानची माहिती जनतेला करून देण्यासाठी 26 नोव्हेंबरला पोस्टर प्रदर्शन, बॅनर्स, निंबध स्पर्धा घेण्याच्या सुचना दिल्या होत्या मात्र त्या पाळल्या जात नसल्याचे चित्र समोर दिसत आहे.

चार वर्षापूर्वी 26/11 ला मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. तो दिवस होता 26 नोव्हेंबर, 'भारतीय संविधानदिन'. मात्र तेव्हापासून संविधान विरोधकांना आणि मनुवाद्याना संविधान दिवसाला विरोध करण्यासाठी एक चांगले कारण भेटले आहे. म्हणून हे नमुने काळा दिवस म्हणून साजरा करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. आणि त्यांचा हा प्रत्यन लोकशाही मानणार्यांनी आणि बाबासाहेबांच्या अनुयायांनी हाणून पाडायचा आहे.

देशावर येणार्‍या संकटप्रसंगी सारे भारतीय, आपले जातीभेत, वंश भेद, धर्म बाजूला ठेवून सारे एकत्र येतात. ही ताकद आपल्याला भारतीय संविधानाचीच आहे. या संविधानामुळेच देशाचे ऐक्य व एकात्मता कायम टिकून आहे. या दिनाप्रमाणेच 15 ऑगस्ट व 26 जानेवारी हे दिवस सरकारच्या कालदर्शिकेतून नाहिसे होणार की काय अशी भिती आता वाटू लागली आहे.

तरी सर्वाना विनंती आहे आज पासूनाच आपण संविधान दिन निमित्त माहितीपूर्ण आणि प्रबोधनपर पोस्ट टाकाव्यात, आणि आप आपल्या स्थानिक पातळ्यावर २६ नोव्हेंबर रोजी सांस्कृतिक, प्रबोधनात्मक कार्यक्रम घ्यावेत........!

No comments:

Post a Comment