१४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरला धम्म दीक्षेसाठी केव्हा येणार आहेत याची कल्पना कोणालाही न्हवती, या संदर्भात बाबासाहेबांनी अत्यंत गुप्तता पाळली, शे.का.फे.च्या नेत्यातील राजकारणाचा उताविळपणा आणि बुद्ध धम्माविषयी अज्ञानता लक्षात घेवूनच बाबासाहेबांनी सोहळ्याची संपूर्ण जबाबदारी नागपूरचे वामनराव गोडबोले यांना सोपवली. दि ११ ऑक्टोबर १९५६ रोजी सकाळी १० वाजता बाबासाहेब विमानाने नागपूरला आले, गोडबोले, सदानंद फुलझेले, आकांत माटे, रेवाराम कवाडे बाबासाहेबांना घ्यायला गेले होते.
दि.१२ ऑक्टोबर १९५६ ला बाबासाहेबांनी घोषित केले कि, बौद्धधर्माची दीक्षा घेणाऱ्या सर्व स्त्री पुरुषांनी पांढरी वस्त्रेच परिधान करावी, २१ वर्ष वरील तरुणांना व इतरांना १ रुपया रीतसर पावती घेवून नावाची नोंद करावी लागेल. दि.१२ ऑक्टोबर १९५६ सायंकाळी ६ वाजता हॉटेल शाम मध्ये कार्यकर्ते जमा झाले, चर्चा सुरु झाली, "एका कार्यकर्त्याने विचारले,"बाबासाहेब आम्ही आपणाबरोबर जर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली तर मग निवडणुकीसाठी रिझर्व सीट वर आम्हाला कसे उभे राहता येईल ?
बाबासाहेबांनी त्या कार्यकर्त्याकडे कटाक्ष टाकला, आणि काहीश्या संतापाच्या आविर्भावाने ते म्हणाले,
"ज्यांना रिझर्वेशन बाबत काळजी वाटते त्यांनी खुशाल जावे, ज्यांना माझ्याबरोबर बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायची आहे, त्यांनी माझेबरोबर राहावे...! (मी पाहिलेले बोधिसत्व - बिक्षु सुमेध - पृष्ठ ८४ )
Dr. Babasaheb Ambedkar At Milind College, Aurangabad
Jay Bhim
No comments:
Post a Comment