Thursday, 17 October 2013

!!!!! अश्विन पोर्णिमा !!!!

                                                                                                !!!!! अश्विन  पोर्णिमा  !!!!

                                                                  आज "अश्विन  पोर्णिमा" या पौर्णिमेचे महत्व जाणून घेऊया 





!!!!! अश्विन  पोर्णिमा  !!!!

बौद्ध धम्मात अस्सायुजो अथवा आश्विन पोर्णिमादि हे सुद्धा वर्षावासाच्या कालावधीतच येते ती वर्षावासातील अंतिम पोर्णिमा म्हणजेच आश्विन पोर्णिमा. आश्विन पोर्णिमा बौद्धजगतामध्ये मोठ्या श्रद्धेने स्मरण केली जाते ती सम्राट अशोकामुळे. या पौर्णिमेला वर्षावासाची सांगता केली जाते. म्हणून या पौर्णिमेचा जास्त महत्व आहे. सम्राट अशोक हा मौर्य वंशाचा संस्थापक सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचा नातू. सम्राट अशोक साऱ्या विश्वात प्रजेवर जीवापाड प्रेम करणारा,वन्यपशुंवरही करुणा दाखवणारा,अहिंसेचे तंतोतंत पालन करणारा,लोक कल्याण आपले आद्य कर्तव्य मानणारा ,प्रियदर्शी राजा म्हणून ओळखला जातो. 

बौद्ध ग्रंथानुसार अशोकाच्या आई चे नाव  शुभदांगीस  होते आणि वडिलांचे नाव बिंदुसार. महाराजा बिंदुसार याने राणी  शुभदांगीस पट्टराणीचा दर्जा दिलेला होता. राणी  शुभदांगी चंपा (भोगलपूर )ची ती ब्राह्मण कन्या होती. नावाप्रमाणे ती अतिशय सुंदर होती. इ.स.पु ३ ० ४ मध्ये  तिच्या पोटी अशोकाचा जन्म झाला. पुत्र प्राप्ती झाल्यानंतर महाराजा बिंदूसारांनी असे म्हटले ,'मी आता शोकरहित झालो' म्हणून त्यांनी आपल्या पुत्राचे नाव अशोक ठेवले. सम्राट अशोकस एकूण पाच राण्या होत्या १. देवी  २.असंधिमित्र  ३ .कालुवाकी   ४.पद्मावती   ५ . तिष्यराक्षिता. राणी "देवी" शी सम्राट अशोकाचा विवाह  इ.स.पु २८६ मध्ये संपन्न झाला. तिच्या पोटी महेंद्र नावाचा पुत्र आणि संघमित्रा नावाची कन्या जन्मास आली. त्यांचा जन्म अनुक्रमे इ.स .पु २८४  व  इ.स .पु  २८२  मध्ये झाला. 

 राज्याभिषेकाच्या  आठव्या वर्षी सम्राट अशोकाने कलिंग ची लढाई जिंकली.  अशोकाच्या जीवनात कलिंगच्या युद्धाने मोठी 'क्रांती घडवून आणली. ते एक अतिशय भयंकर युद्ध होते. त्यात सुमारे एक लक्ष्य सैनिक मारले गेले.दिड  लक्ष सैनिक जायबंदी झाले. तीन लक्ष सैनिकांना बंदी बनविण्यात आले. कलिंगचे युद्ध अशोकाच्या जीवनातील शेवटचे युद्ध होते. या ज्वालामुखी युद्धाने जो विनाश झाला ,त्याचा अशोकाच्या मनावर फार गंभीर प्रभाव पडला. युद्धात मारल्या गेलेल्या सैनिकांच्या विधवांच्या रडण्याने ,बालकांच्या आक्रोशाने त्याला खूप पश्चाताप झाला. त्याचा त्याच्या जीवनावर युगांतकारी प्रभाव पडला. 

अशा या शोकाकुल मनाच्या अवस्थेत त्याच शांतीची गरज होती. नेमक्या त्याच वेळी भिक्खू मोग्गलिपुत्त तिस्स या भिक्खूंची भेट झाली. त्यांच्या 'अप्पमाद-वग्ग (अप्रमादवर्ग) या उपदेशाने त्याचे संपूर्ण जीवनच बदलून गेले. भन्ते  मोग्गलिपुत्त तिस्स यांस सम्राट अशोकाने  आपला धम्म गुरु मानले. अशोकाने भन्ते  मोग्गलिपुत्त तिस्स कडून बौद्धधम्माची दीक्षा घेतली. त्यांनी महाराजा अशोकास धम्मपदातील उपदेश पुढीलप्रमाणे दिला -

               अप्पमादो अमतपदं पामादो मच्चुनो पदं । 
               अप्पमत्ता न नियन्ति ये परमत्ता यथा मता ॥   

अर्थ -प्रमाद  न करणारा अमृत पदाचा साधक बनतो आणि प्रमाद करणारा मृत्यूपदाचा. अप्रमादी माणसे मारत नाहीत,परंतु प्रमादी मनुष्य नेहमी मृत्यू समान असतो. 

तर ज्या दिवशी भिक्खू मोग्गलीपुत्त तिस्स यांच्या संपर्कात येउन सम्राट अशोक ने त्यांच्या कडून दीक्षा घेतली.बौद्ध उपासक बनला .तो दिवस होता अश्विन शुद्ध दशमी ,इ . स . पु. २ ६ ६ चा यासच अशोक विजया दशमी म्हणतात. सम्राट अशोकाच्या धम्मादिक्षेनंतर त्याच्या राज्यातील तमाम सर्वसामान्य जनताही धम्माकडे वळली. 

भगवंतांच्या महापारीनिर्वानानंतर त्यांच्या अवशेषांची आठ भागामध्ये विभागणी करून आपापल्या राज्यांत स्तूप वा चैत्य बनविण्यात येउन त्यात अस्थि -वशेष ठेवण्यात आले. ती पुण्ये स्थाने पुढीलप्रमाणे -
१ . अजातशत्रू -राजगृह
२ . शाक्य -कपिलवस्तू 
३ . बुली -अलकप्प 
४ . कोलिय -रामग्राम 
५ . मल्ल -पावा 
६ . लिच्छवी -वैशाली 
७ . ब्राह्मण -वेठद्वीप
८ . मल्ल -कुशीनगर . 

या सर्व ठिकाणांवरून धातू काढून त्यांची अनेक संख्येत विभागणी करून अशोकांनी त्या अवशेषांवर विविध ठिकाणी ८४००० हजार स्तूप बनविले.

No comments:

Post a Comment