Sunday, 27 October 2013

"इडा -पिडा टळो आणि पुन्हा बळीचे राज्य येवो."











"दिवाळी"

"बळी राजाचा दिला बळी ,ब्राह्मण खाती पोळी !!!!"

"ऐका कथा दिवाळी सणाची", 

        प्राचीन काळी नरकासुर नावाचा एक राक्षस म्हणजे मोठा पराक्रमी,अनार्यांचा नेता होता. त्याने तपश्चर्या करून देवाकडून वरदान मिळवले होते. देवांनी त्याला 'वैषनालास' हे शक्तिशाली अस्त्र दिले होते. तेव्हा तो नरकासुर राक्षस देवांना हि त्रास देऊ लागला. त्याने इंद्राचा ऐरावत (हत्ती) व घोडा पळवून नेला . सर्व देवन पकडून तुरुंगात टाकले. अनेक स्त्रियांना बंदिवान केले. त्यांच्यावर अत्याचार केले . त्याच्या जुलुमामुळे हैराण झालेल्या भूदेवांनी म्हणजे आर्य ब्राह्मणांनी भगवान श्रीकृष्णाकडे तक्रार केली. तेव्हा श्रीकृष्णाने त्या नरकासुरा सोबत युद्ध करून त्याला ठार मारले आणि तुरुंगात बंदी करून ठेवलेल्या राजांना व स्त्रियांना सोडविले. नरकासुराला ठार मारल्यानंतर स्त्रियांनी आरत्या ओवाळून श्रीकृष्णाचे स्वागत केले,तर लोकांनी आपापल्या घरीदारी पणतीचे दिवे पेटवून आणि फटके लावून सर्वत्र जल्लोष केला . प्रत्येक घरी पुरणपोळीचे गोड जेवण केले व तो दिवस आनंदोस्तव म्हणून साजरा केला. तो नरक चतुर्थीचा दिवस होता. त्या दिवशी सर्व लोकांनी दिवाळीचा सण साजरा केला. आपल्यावरील नरकासुराचे संकट दूर झाले म्हणून लोक दिवाळीचा सन साजरा करतात.   

               दिवाळीच्या सणाबद्दल ची दुसरी एक कथा हिंदू शास्त्र पुराणात आहे. ती कथा अशी आहे प्रल्हाद या'अनार्य राजाचा नातू बळीराजा प्रल्हादाच्या नंतर राजा झाला. बळीराजा मोठा पराक्रमी,कर्तबगार ,कर्तव्यनिष्ठ,न्यायी ,दयाळू प्रजाहितदक्ष व दानशूर होता. त्यांनी आपल्या राज्यात सुखसमृद्धी निर्माण केली होती . त्यांनी प्रजेच्या हिताची व कल्याणाची चांगली कामे केली होती. त्यामुळे बळीराजाच्या राज्यातील सर्व प्रजा सुखी व समाधानी होती . त्यामुळे सर्व प्रजा बळीराजाला देवासमान मानीत होती. त्याच्याकडे कोणी गरजू माणूस किंवा भिक्षुक गेला तर,तर त्यांना बळीराजा मदत करीत. पण त्याचे विरोधक आर्य व ब्राह्मण त्याचा द्वेष करीत होती . कारण बळीराजा आर्यांचा वैदिक धर्म,ब्राह्मणांचे वर्णवर्चस्व आणि त्यांच्या देवन मनी नव्हता. त्यांना विरोध करीत होता. बळीराजाने आपल्या  पराक्रमाच्या जोरावर कारस्थानी आर्य ब्राह्मणांचा पूर्ण बंदोबस्त केला होता. तो मोठा बळी होता. त्यावरून "बळी तो कानपिळी" अशी म्हण पडलेली आहे. अशा त्या महाबळी  बळीराजाचा कट काढण्यासाठी कारस्थानी आर्यांनी एक कपट कारस्थान रचले. आर्यांचा प्रमुख वामन याने ती कामगिरी पार पडली. 

                 वामन हा धूर्त व कपटी होता. त्याने भिक्षुकाचे सोंग घेतले आणि तो बळीराजाकडे गेला व म्हणाला,"हे राजा,तू मोठा पराक्रमी,दयाळू आणि दानशूर आहेस. तेव्हा मला फक्त तीन पावले जमीन दान  दे. मी एक याचक तुझ्या दारी भिकेसाठी आलो आहे. "तेव्हा त्या भोळ्या बळीराजाने कसलाही विचार न करता त्या कपटी वामनाला तीन पावले जमीन दान दिली.तेव्हा त्या कपटी व विश्वासघातकी वामनाने (विष्णूच्या अवताराने) म्हणे आपले विराट रूप प्रगट केले व पहिले पाऊल उचलून सर्व आकाश व्यापले ,दुसरे पाऊल टाकून सारी पृथ्वी व्यापली. तिसरे पाऊल ठेविला त्याला जागा शिल्लक नव्हती. म्हणून त्याने बळीराजाला विचारले,"हे राजा,आता मी तिसरे पाऊल कोठे ठेवु ?"तेव्हा बळीराजा म्हणाला,"ठेव माझ्या डोक्यावर," त्यावेळी कपटी व दुष्ट वामनाने तिसरे पाऊल उचलून बळीराजाच्या डोईवर ठेवले आणि त्याला पाताळात गाडले व बळीराजाचा शेवट केला. खरे तर कपटी वामनाने विश्वासघाताने ठार मारले. परंतु त्यासंबंधी धूर्त ब्राह्मणांनी त्या घटनेचा संबंध विष्णूच्या अवताराशी जोडून आणि एक कपोलकल्पित कथा निर्माण केली व तिला सणाचे स्वरूप दिले आहे. हि खरी वस्तुस्थिती आहे.  हि कथा खोटी आहे.  

     "बळीराजा दुष्ट ,दुर्जन ,दुचारी व अन्यायी होता. त्याने प्रजेवर अनेक अन्याय -अत्याचार केले. म्हणून भगवान विष्णूने वामनाचा अवतार घेऊन त्या दुष्ट राक्षस बळीराजाला पाताळात गाडले आणि प्रजेला बळीराजाच्या जाच्यातून मुक्त केले. त्यावेळी सर्व प्रजेने आपल्या घरीदारी आकाशदीप लावले. पणत्या पेटवल्या,पणत्यांची आणि रांगोळ्यांची  आरास केली. फाटके वाजविले व सर्वांनी आनंदोस्तव साजरा केला. बळीराजाला वामनाने'पाताळात गाडल्यानंतर सर्व प्रजेने पुरणपोळीचे व गोड जेवण केले आणि आपला आनंद व्यक्त केला. त्या दिवसापासून दिवाळीचा सण साजरा केला जातो. अशी पुराणकथा हिंदुशास्त्र,भागवत पुराणात आहे. परंतु त्या गोष्टीवर विश्वास बसत नाही. कारण बळीराजा जर दुष्ट असता ,अन्यायी होता,प्रजेला त्रास देत होता तर आज सुद्धा खेड्यातील स्त्रिया दिवाळी पाडव्याला पुरुषांना ओवाळताना म्हणतात. "इडा -पिडा ळो आणि पुन्हा बळीचे राज्य येवो. "  'इडा -पिडा म्हणजे ब्राह्मणांकडून बहुजन समाजाला होणारा त्रास टळो,असा त्या म्हणण्या मागील अर्थ आहे. मग बळीराजा दुष्ट व अन्यायी कसा ? वाईट कसा? खरेतर बळीराजा प्रजाहितदक्ष,दयाळू,कर्तव्यदक्ष व आदर्श राजा होता. पण आपला शत्रू म्हणून कावेबाज ब्राह्मणांनी कपटकारस्थान करून बळीराजाचा खून केला आणि त्या सत्य इतिहासचा विपर्यास केला आहे. तो सत्य इतिहास व ब्राह्मणांचे कारस्थान ब्राह्मणेत्तर बहुजन समाजाने समजून घेतले पाहिजे. दिवाळी हा सण आर्य ब्राह्मनांच्या विजयाचा आणि आनंदाचा ,तर ब्राह्मणेत्तर बहिजन समाजाच्या पराभवाचा ,दुःखाचा व सुतकाचा आहे. मग दिवाळी चा  सण आमचा आनंदाचा म्हणून दरवर्षी साजरा करायचा का? हा प्रश्न आहे. 

"दिवाळीचा सण श्रीमंताचा आहे. गरीबांचा नव्हे!!!!" 

"श्रीमंतांची रोजच असते दिवाळी,गरिबांच्या जीवनांची होत असते होळी!!!"

   या देशात ३० कोटी गरीब जनता दारिद्रयरेषेखाली हलाखीचे जीवन जगते आहे. "ठेविले अनंते तैसेचि राहावे,चित्ति असून द्यावे समाधान ," या समजुतीने बहुजन समज आपले कष्टमय जीवन जगात असतो. परंतु आपल्यावर हि पाळी का आली ? याचा बहुजन'समाज करीत नाही. हे त्याचे दुर्दैव आहे. हे सारे भोग आपल्या सणामागे आहे. निदान आता तरी बहुजन समाजाने जागे व शहाणे व्हावे आणि आपण साजरे करीत असलेल्या सणामागचा खरा व खोटा इतिहास समजून घ्यावा.





No comments:

Post a Comment