Monday, 9 July 2012

मला पडलेले काही प्रश्न



मला पडलेले काही प्रश्न ( मला कोणत्याहि बांधवाचे मन दुखवायचे नाही तसेच मी कोणत्या हि धर्माचा द्वेष्टा नाही...पण हे प्रश्न सहज मनात आले..त्यामुळे सहजतेनेच ह्याचं उत्तर शोधायचा प्रयत्न करा .. )
१. शनी ची नजर जर सगळीकडे असते तर त्याची वक्रदृष्टी इकडे लंडन वल्यावर का पडत नाही (इकडे तर प्रत्येक शनिवारी मटन आणि दारूच्या पार्ट्या असतात ).?
२. भारतात ३३ कोटी देव आहेत आणि भारताची लोकसंख्या आहे १२५ कोटी ..म्हणजे प्रत्येक देवाच्या वाट्याला फक्त ४-५ लोक ..तरी पण भारताची निम्मी लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली का ? ..जे देव ४-५ लोकांना देखील सांभाळू शकत नाहीत त्यांना काय चाटायचं आहे ?....
३. लक्ष्मी हि देवी मूळ भारतीय असताना आपला भारत दरिद्री का ..आणि लंडन वाल्या वर एवढी मेहरबाण का ?..म्हणजे लक्ष्मी देश द्रोही ठरू शकते ..
४. ग्लोबल वार्मिंग मध्ये कैलाश पर्वतावरील बर्फ का वितळत नाही .? आणि जर वितळलेच तर आपले शंभू महादेव कुठे जातील .?
५. सीता ४-५ वर्षाची असताना शिवधनुष्याला पेलायची आणि अंगाखांद्यावर खेळवायची....तोच शिवधनुष्य रावणाला पेलवला नाही व रावण छातीवर शिवधनुष्य घेऊन पडला ....मग एवढ्या ताकतवान सीतेला रावण कीडन्याप कसा करू शकतो .?..आणि ज्या रावणाने सीतेला तिच्या मर्जी विरुद्ध हात देखील लावला नाही तो राक्षस आणि चारित्र्य हीन कसा ठरू शकतो ..?

No comments:

Post a Comment