Sunday, 29 July 2012

बौद्ध व्हायचे असेल तर २२ प्रतीज्ञांचे पालन करावे लागेल...!!!




बौद्ध व्हायचे असेल तर २२ प्रतीज्ञांचे पालन करावे लागेल...!!!

एक बाई असते कि जिचे नुकतेच लग्न झाले असते लागणा आधी तिचे संसाराविषयी खूप स्वप्न असतात पण होते उलटेच नवरा हा खूप अय्याश असतो आगदि पहिल्या दिवसापासून तिला मारतो, डोक्यावर पदर घेतला नाही मारतो, घराच्या बाहेर का उभी राहिलीस मार, भाजीत मीठ कमी घातले मार कारण असो व नसो रोज मार ठरलेला. तिलाही सवय झाली होती तिला वाटायचे आपली बाईची जात बाईला जातीला हे सर्व सहन करावेच लागते पण तिलाही कोणीतरी समजावणारा भेटतो व तिला समजावतो कि तू का इतके सहन करतेस. तिलाही ते पटायला लागते व ती ठरवते कि आपण नवर्याला समजावले पाहिजे. नवरा आला तिने त्यला समजावण्याचा प्रयत्न केला पण वर तोंड करून बोलतेस पुन्हा मार नंतर ती खूप विचार करते कि याला समजावून उपयोग नाही हा सुधारणार नाही मग कंटाळून ती निर्णय घेते …फारकत.. घटस्पोट…रीतसर त्याच्याशी फारकत घेते आणि योगायोग लगेच तिचे दुसरे लग्न होते. नवरा इतका चांगला असतो कि तिचा खूप लाड करतो, तिला हिल चे चप्पल, डोक्यावर पदर तर सोडाच तिला छान छान ड्रेस, नाटक, सिनेमा सर्व काही तिच्या मनासारखे. एवढे सर्व असताना जर ती चोरून आपली आधीच्या नवर्या कडे जात असेल व त्याच्याशी संबंध ठेवत असेल तर तिला काय म्हणायचे. हेच माझ्या मित्राने मला विचारले कि तू देवाला मानतोस का तर त्याला आधी हि गोष्ट सांगितली तर तो म्हणाला त्या बाईला चपलेने मारले पाहिजे मग मी त्याला समजावत म्हटले कि मी पूर्वी महार होतो महार म्हणजे हिंदू धर्मातली एक जात जोपर्यंत मी महार होतो तो पर्यंत मी हिंदू धर्माप्रमाणे वागत होतो उपवास तपास करत होतो, हिंदूंचे सन उदा. दिवाळी दसरा होळी इ. तसेच देव देवता मानत होतो तरीही हिंदू आम्हाला माणूस म्हणून वागवत नव्हता जसा तो नवरा त्या बाईला त्रास द्यायचा तसेच हिंदू आम्हाला गुलाम म्हणून वागवत होतो आम्हालाही कोणीतरी शिकविणारा भेटला त्याने पूर्ण व्यवस्थेशी टक्कर दिली आणि आम्हाला माणूसपण शिकविले व हिंदू धर्माला खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण जसा तो नवरा ऐकत नव्हता तसेच हिंदू हि ऐकत नव्हता शेवटी कंटाळून आम्ही हिंदू धर्माशी फारकत घेतली बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितले होते कि मी सांगतो म्हणून बौद्ध होऊ नका जर बौद्ध व्हायचे असेल तर २२ प्रतीज्ञांचे पालन करावे लागेल त्या २२ प्रतिज्ञा मध्ये पहिल्या ५ प्रतिज्ञा ह्या देवा विरोधात आहेत बाबासाहेबांनी पूर्ण अभासांती जाणले कि आमचा समाज इतका काळ अज्ञानानात राहिला त्याचे कारण हे देव आहे. आणि आजही आमचे काही बांधव देव देवतांना मानतात, पायात गळ्यात गंडे दोरे घालतात, विना चप्पल देवाला जातात स्वताला बौद्ध म्हणतात आणि वागणूक सर्व हिंदू धर्माप्रमाणे करतात अशांना काय म्हणावे हा माझा तुम्हाला प्रश्न...?

No comments:

Post a Comment