Friday, 13 July 2012




रामदासाला छत्रपती शिवाजी राजांचे गुरु बनवायचेच असा ठेका घेतलेल्या स. कृ. जोशीचे 'जय जय रघुवीर समर्थ' पुस्तक वाचले.. 'जिवाशिवाची भेट' ह्या पाठात शिवाजी राजे आणि रामदास याचं वर्णन अतिशय खोडसाळपणाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.. आक्षेपार्ह मुद्दे,
१. शिवबांची स्वामींच्या दर्शनाची तळमळ वाढली होती. शिवबांना समर्थ दिसले. शिवबा जागे झाले तर ते एक मधुर स्वप्न. स्वामी नाही नि कुणी नाही. पण स्वप्नात स्वामींनी नारळ दिला होता तो मात्र हातात खरोखरीचा होता. (८५)
२. शिंगणवाडीत दोघांची शेवटची भेट झाली असे दिले आहे.. आणि नंतर ४ भेटी दाखवण्यात आल्या आहेत..(८६)
३. कारंजा येथे समर्थांनी शिवाजी राजांच्या खांद्यावर भिक्षेची झोळी दिली आणि शिवाजी राजांना वैरागी होऊन भिक्षा मागणे खूप आवडले, राजांनी आयुष्यभर भिक्षा मागू इच्छिले..(९७)
४. याच भेटीवेळी रामदासाने शिवाजी राजांना स्वराज्याचा झेंडा भगवा लावण्याचा उपदेश केला म्हणे (९८).. पण राजांनी त्याआधीच तोरणा, कोंढाणा असे अनेक किल्ली जिंकून तिथे भगवा फडकवला होता. असे एक ना अनेक आक्षेपार्ह मुद्दे आहेत..

5. सर्वात महत्वाचे, रामदासलिखित दासबोधात कुठेही शिवाजी राजांचा नावे उल्लेख नाही..
फक्त राजा मग तो कुठलाही असो.. त्या राजाला दिलेले उपदेश आहेत.. एका राजाने कसे राहावे, अडचणीच्या वेळी कुठले निर्णय कसे घ्यावे, लोकांशी कसे तारतम्य ठेवावे, राजाने राज्यकारभार कसा हाकावा,,, असे.
उदा.
आधी मनुष्य ओळखावे | योग्य पाहुनी काम सांगावे
निकामी तरी ठेवावे | एकीकडे ||
मनुष्य राजी राखणे | हीच भाग्याची लक्षणे
काठीणपणे दुरी धरणे | काही एक ||
किंवा
अनीतीने स्वार्थ पाहे, राजा पापी होऊन राहे | राज्यांती नर्क आहे ||

हा राजाला (मग तो कुठलाही असो) दिलेले उपदेश आहेत.. तिथे स. कृ. जोशीने कुठलाही राजा म्हणजे छत्रपती शिवाजीच असे एकहाती वर्णन करून कल्पनारूपी इतिहास मांडण्याचा असफल प्रयत्न केला आहे.
पुस्तकाला कुठलाही संदर्भ दिलेला नाही.. स.कृ.जोशीने असेच लिखाण इतर ७ पुस्तकांतून करून रामदासाला शिवाजी राजांचे गुरु बनवण्याचा प्रयत्न करू पहिला..

गरज आहे ती असल्या काल्पनिक इतिहासावर बंदी आणण्याची. भंपकपणे रंगवलेल्या कल्पनारूपी भाकडकथा म्हणजे इतिहास नसतो.. मी इतिहासाची व्याख्या दोन शब्दात 'भूतकाळातील वास्तव' अशी सांगेन.

No comments:

Post a Comment