Monday, 9 July 2012

" नवस " नव्हे मुर्खपणाचा कळस ............




" नवस " नव्हे मुर्खपणाचा कळस ............

नवस म्हणजे देवा समोर मांडलेली एक मनातील इच्छा / मनीषा अणि त्या बदल्यात काही तरी बक्षिस / मोबदला देण्याचे ( देवाला ?? ) वचन ..ही साधी व्याख्या आहे.

मी या गोष्टीला लाच म्हणेल.... लहान पनापासुनच हे शिकवले जाते ?? ..

देव या संकल्पनेचे भूत समाजाच्या मानगुटिवर इतके घट्ट बसवलेले आहे की त्यातून निर्माण झालेल्या भीती मुळे लोक नर बळी सुद्धा द्यायला मागे पुढे पाहत नाहीत.

देव ही जर अशी असामान्य शक्ति आहे तर ती भक्ताच्या शुल्लक मोबदल्यावर कशी काय काम करते अणि जर देव असे करतो तर तो देव कसा ?

बर ! नवस नाही फेडला तर देव कोपतो ? ही सर्व मानवी लक्षणे आहेत, दैवी नाही.

सर्वात हास्यास्पद गोष्ट म्हणजे मूल होत नाही म्हणून केलेला नवस ! असा नवस करताना पुरुषाला खरच स्वतः वर विश्वास असतो ?

नुकतेच वणीला ( नाशिक ) नवस बोलून आलेल्या दम्पत्यास अपघात झाला आणि दोघांचा मृत्यु झाला ... देवीने अशा परिस्थितीत त्याना वाचवायला हवे होते.. निदान नवस पूर्ण होई पर्यंत !!!

लालबाग ला नवसाची रांग वेगळी का असते ?? मला न उमजलेले कोड़े आहे. या रांगेतील भक्त पण देवा कड़े काहि ना काही मागतात आणि दर्शनाच्या रांगेतील भक्त सुद्धा काहि ना काही मगताताच... मग जनता इतका अंध विश्वास कसा काय ठेवते ...याला परिस्थिति आणि भीती कारण असू शकते.

मला एक प्रश्न नेहेमी पडतो, की कुठल्याही मंदीरात गेलात तरीही देव तर एकच आहे, मग केवळ काही ठरावीक मंदीरातलेच देव का बरं पावतात- किंवा नवसाला रिस्पॉंड करतात? जर सगळे देव एकच आहे, तर मग कुठल्याही मंदीरात ला किंवा घरच्या पुजेतला देव पण नवसाला पावला पाहीजे – नाही का??

पण तसे असले तरीही ते लोकांच्या सहज पचनी पडत नाही, आणि लोकं ठरावीक मंदिरासमोर रांगा लावून उभे असतात.. ही अंध श्रद्धा नाही तर मुर्ख पणा आहे

मराठी सिनेमा / धारावाहिक मधे हे सर्रास दाखवले जात आहे ... सचिन चा " नवरा माझा नवसाचा" हा सिनेमा काय शिकवतो लोकाना ?? पूर्ण न केलेल्या नवासा साठी धावपळ !!

नाशिकला एक गणपती मंदीर आहे, त्याला ’नवशा गणपत” म्हणतात- हा गणपती नवसाला पावतो अशी वंदता आहे,समोर एका खांबावर बांधून ठेवलेल्या निरनिराळ्या आकाराच्या घंटा आहेत . या घंटा बहूतेक नवस पुर्तीसाठी बांधल्या गेल्या असाव्यात . इथे बहूतेक लोकं मुलगा व्हावा म्हणून नवस बोलतात, आणि तो पुर्ण झाला की इथे घंटा बांधतात.सहज मनात प्रश्न आला की जर नवस बोलूनही एखाद्याला मुलगी झाली तर……… ???

शिर्डीच्या साईबाबाला कोणा एका भक्ताने काही कोटी रुपये किमतीचे सोन्याचे सिंहासन भेट दिले ,तसेच तिरुपती बालाजीला कोणीतरी एका भक्ताने हिरेजडीत मुकुट वाहीले अशी बातमी होती. ह्या दोन बातम्या आणि आणि त्याच बरोबर काही महिन्यापूर्वी शिर्डीच्या मंदिरात झालेल्या केल्या गेलेल्या घोटाळ्याबाबत आणि त्या मधे ट्रस्टीपैकी काही लोकांच्या इन्व्हॉल्व्हमेंट बद्दल वाचलेले आणि तिरूपतीच्या पुजाऱ्याने केलेल्या करोडॊ रुपयांच्या अपहारा बद्दल पण आठवले -आणि मनात आले की देवाला स्वतःचेच रक्षण करता येत नाही??. असो…

– थांबतो इथेच, नाहीतर मुद्दा पुर्णपणे डायव्हर्ट व्हायचा.

मित्रानो-मैत्रिणीनो आज आपल्या समाजला या गोष्टीतून बाहेर काढायला पाहिजे, कमकुवत मनातून निर्माण झालेली भीती अणि स्वतः वरचा अविश्वास आणि न्यूनगंड अशा प्रकाराला प्रवृत्त करतो.

नवस आणि कर्म काण्ड पासून समाजाला दूर करण्यासाठी विज्ञानवादी विचारांचा प्रसार आणि प्रचार करा ...

धन्यवाद्
 

No comments:

Post a Comment