Friday, 10 August 2012

बौद्धांचा अपमान थांबवा






काही लोकांनी ह्या बौद्ध झालेल्या समाजाचा इतका द्वेष बाळगणे सुरु केले कि त्यांनी सरळ “महारांनी बाबासाहेबांना जोड्याने मारून महाराष्ट्र बाहेर केले”-(कांशीराम) म्हणायला सुरुवात केली(मला यात बौद्धांचा कमी बाबासाहेबांच्या प्रती असलेली अनास्थाच जास्त दिसते).पण जर असे असते तर बाहेर केलेले बाबासाहेब या लोकांना त्यांच्याच राज्यात जिथे त्यांनी जन्म घेतला तिथे का नाही समजले.त्यांना का महाराष्ट्रातील बौद्ध झालेल्या लोकांकडूनच आणि तेही महाराष्ट्रातच बाबासाहेब माहित झाले,महात्मा ज्योतिबा फुले माहित झाले.

१ जानेवारी १८१८ साली भीमा कोरेगाव येथे भीमा नदीच्या काठी ५०० अतिशूद्र आणि २५००० पेशवा सैनिकांमध्ये लढाई झाली ज्या मध्ये ५०० अतिशूद्र असलेल्या महार लढवय्यानी २५००० पेशवा सैनिकांना हरुवन पेशव्यांचे माणूसकीला काळिमा फासणारे राज्य संपुष्टात आणले. महार सैनिकांनी केलेल्या या पेशावाईच्या अंतामुळेच भारतात समतेच्या लढाईचे पर्व सुरु करता आले.
१४ एप्रिल १८९१ साली महार समाजात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला व क्रांतिसूर्य जोतिराव फुले यांनी सुरु केलेल्या समतेच्या लढ्याला एक नवी संजीवनी मिळाली. समतेच्या या लढ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय कठीण परिस्थितीत सुरु ठेवत एक नवीन इतिहास घडविला व भारतात बौद्ध धम्म पुन्हा प्रस्थापित केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपला मुक्तिदाता मानून महार समाजाने समोर येईल त्या परिस्थितीला तोंड देत आपल्या मुक्तीदाताच्या प्रत्येक शब्द पाळला. १४ ऑक्टोबर १९५६ साली बाबासाहेबांनी केलेली धम्म क्रांती आपला नवा जन्म मानून महार समाजाने आपली मेलेली ढोर ओढून नेवून त्यांना खाणे हि आपली ओळख सोडून स्वतःची नवीन ओळख उभी केली ती म्हणजे बौद्ध.
प्रत्येक बौद्ध झालेल्या महारांच्या घरात असलेले देवी देवता एका दिवसात पाण्यात विसर्जित करण्यात आले त्या दिवशी.प्रत्येक घरात बुद्धं शरणं गच्छामि ऐकायला मिळणे सुरु झाले. अश्यातच ६ डिसेंबर १९५६ ला बाबासाहेबांचे महापरीनिर्वाण झाले.दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांच्या अंतिम संस्काराच्या वेळी सुद्धा त्यांच्या अनुयायांनी इतिहास घडविला ७ लक्ष लोकांनी बाबांच्या पार्थिव समोर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.
त्यानंतर एक अत्याचारचे पर्व सुरु झाले.तुम्ही बौद्ध नाही तुम्ही महारच आमचे गुलामच बौद्ध झालेल्या महारांच्या वस्त्यांवर अतोनात हल्ले झाले सामुहिक बहिष्कार टाकण्यात आले.पण तरीही ह्या नव दीक्षित समाजाने शरणागती पत्करली नाही आणि “आम्ही आता महार नाही,आम्ही महारकी सोडली,आम्ही बौद्ध झालो” हि ओळख जातीयवाद्यांच्या मनात प्रस्थापित केली.
मागच्या २०-३० वर्षांचा कालावधी पाहता स्वताला आंबेडकरवादी म्हणवून घेणाऱ्या काही लोकांनी ह्या बौद्ध झालेल्या पूर्वाश्रमीच्या महार लोकांना पुन्हा हिणविणे सुरु केले.त्यांच्यावर नव नवीन आरोप करून त्यांनी केलेले व करीत असलेले कर्तृत्व नाकारून त्यांना शिवीगाळ करणे सुरु केले.
काय बौद्ध झालेला समाज हा इतका नालायक निघाला कि त्यांना अश्याप्रकारे हिणवण्यात येवू लागले? जर असे असेल तर मग बाबासाहेबांचे महापरीनिर्वान झाल्या नंतर घरा घरात बुद्ध वंदना,महात्मा ज्योतिबा फुले,माता सावित्राबाई फुले हे काय आपोआप पोहचले,ढोर ओढणार्यांच्या घरात शिक्षणाचे पडघम कसे काय वाजू लागले हे न समजण्या पलीकडचे आहे.
काही लोकांनी ह्या बौद्ध झालेल्या समाजाचा इतका द्वेष बाळगणे सुरु केले कि त्यांनी सरळ “महारांनी बाबासाहेबांना जोड्याने मारून महाराष्ट्र बाहेर केले”-(कांशीराम) म्हणायला सुरुवात केली(मला यात बौद्धांचा कमी बाबासाहेबांच्या प्रती असलेली अनास्थाच जास्त दिसते).पण जर असे असते तर बाहेर केलेले बाबासाहेब या लोकांना त्यांच्याच राज्यात जिथे त्यांनी जन्म घेतला तिथे का नाही समजले.त्यांना का महाराष्ट्रातील बौद्ध झालेल्या लोकांकडूनच आणि तेही महाराष्ट्रातच बाबासाहेब माहित झाले,महात्मा ज्योतिबा फुले माहित झाले.
उन्नतीच्या प्रत्येक क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करून नेहमीच चळवळी साठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष योगदान देणारे बौद्ध लोक राजकीय क्षेत्रात माघारले.आणि याचा फायदा घेवून कांशीराम यांनी बौद्ध समजा विरोधात आग ओकायला सुरुवात केली.ते म्हणाले होते कि “महाराष्ट्र के महार लोग भिक मांगते है” म्हणजे महार लोकांनी केलेली धम्म क्रांती यांना माहीतच म्हणून ते महार आणि यांच्या मते बौद्ध लोक भिकारी आहेत.नंतर हे म्हणतात कि “देने वाले समाज मे लाल पैदा होते है,और लेने वाले समाज मे दलाल और भडवे होते है.” त्यांच्या ह्या म्हणण्याच्या अर्थ सरळ होता कि महार समाजात दलाल आणि भडवे जन्म घेतात म्हणून.जणू काही बौद्ध समाजातील स्त्रिया या व्यभिचारिणी आहेत ज्या फक्त दलाल आणि भडवे जन्मास घालतात.
एवढा पराकोटीचा बौद्ध समाजाप्रती विरोध कश्यासाठी.बौद्ध लोकांनी कधी आपली राज्यात सत्ता राहावी म्हणून संविधान समीक्षा करणाऱ्या सरकारला पाठींबा नाही दिला.सत्ते साठी कधी बाबासाहेब यांच्यावर अतिशय आक्षेपार्ह्य पुस्तक लिहिणाऱ्याच्या पक्षाला सुद्धा बौद्धांनी कधी समर्थन दिले नाही.उलट संविधान सामिक्षेवेली गल्ली पासून तर दिल्ली पर्यंत या समाजाने रान माजविले.बाबासाहेब यांच्यावर आक्षेपार्ह्य पुस्तक लिहिणाऱ्या अरुण शौरी याचे तोंडही काळे याच समाजाने केले फक्त तोंडच काळे नाही केले तर त्याने लिहिलेल्या पुस्तकास Reference सहित उत्तर म्हणून अनेको पुस्तके सुद्धा याच समाजाने लिहिले.अश्या खूप गोष्टी आहेत ज्या बौद्ध समाजाने केल्या आहेत अगदी कांशीराम यांना थैल्या भरून पैसे सुद्धा पुरविले आहेत पण तरीही ह्या समाजातील आई बहिणी दलाल भडवेच जन्मास घालतात.
बौद्ध समाजावरील द्वेष आणि आरोप असेच सुरु ठेवत कांशीराम म्हणतात कि “महार लोग शाहू महाराज और महात्मा फुले के जन्मदिन नही मनाते.वो केह्ती है कि हम अब बौद्ध हो गये है.”.अशी वाक्ये वापरून हे सिद्ध करायचा प्रयत्न त्यांनी केला आहे कि बौद्ध समाजाने कधीच दुसऱ्या जातींना चळवळीत जोडले नाही जर हे सत्य असेल तर घर घरात ज्योतिबा फुलेना स्थान देवून आपला उद्धारकर्ता कोणी मानले,आजही प्रत्येक बौद्ध वस्तीत ज्योतिबा फुल्यांचे पुतळे का दिसतात,सावित्रीमातेचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यास कोणी सुरुवात केली , “जयभीम”चा उद्घोष करेनच असे म्हणणाऱ्या शहीद पोचीराम कांबळे ह्या मातंग समाजातील तरुणास आंदोलनात कोणी आणले,पूर्वाश्रमीच्या महार समाजाने केलेल्या धम्म क्रांतीला आदर्श मानून स्वताच्या समाज बांधवांच्या सोबत धम्म दीक्षा घेणारे लक्ष्मण माने हे कश्याचे द्योतक आहे.आजही ओबीसी बांधवांच्या सोबत धम्म दीक्षेच्या तयारीत लागलेले हनुमंत उपरे यांना बौद्ध धम्माचे बाळकडू कोणी पाजले.
बौद्ध समाजाप्रती इतका द्वेष बाळगनार्यांनी फक्त इतके लक्षात ठेवावे कि जर बौद्ध समाजाने या एकदम खालच्या थरातील जातीयवादी आरोपांना तश्याच प्रकारे जातीयवादी उत्तर दिले तर काय होईल.बौद्ध समाज आजही काही बोलत नाही कारण त्यांना ह्या जातीयवादी लोकांना त्यांच्या भाषेत उत्तर देवून जातीय भांडणे वाढवून जातीयवाद्यांचे सहकारी व्हायचे नाही.
चळवळीच्या नावाखाली बौद्धांना शिवीगाळ करण्याची हि पद्धत या वेळीच थांबविण्यात यावी.बौद्धांच्या सहनशिलतेचा अंत कुणी पाहू नये हीच सदिच्छा.
जयभीम.

No comments:

Post a Comment